shayari on love
कोणी गेलं म्हणून,
आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...
जगायचं असतं प्रत्येक क्षण,
उगाच श्वासांना लांबवून ठेवायचं नसतं...
आठवणींच्या वाटांवरून
आपल्या स्वप्नापर्यंत पोहोचायचं
असतं...
आभाळापर्यंत पोहोचता येत नसतं कधी,
त्याला खाली खेचायचं असतं...
कसं ही असलं आयुष्य आपलं,
आयुष्य थांबवून ठेवायचं नसतं...
दिवस तुझा नसेलही, रात्र तुझीच आहे.
त्या रात्रीला नवीन स्वप्नं मागायचं
असतं...
तुझ्याच वेड्या श्वासांकडे
थोडं जगणं मागायचं असतं...
खरं प्रेम म्हणजे एकमेकानां सांभाळणे.
खरं प्रेम म्हणजे चुकत चुकत शहाणे होणे.
खरं प्रेम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सोबत
असणे.
खरं प्रेम म्हणजे प्रेमबरोबर प्रमाणिक असणे.
खरं प्रेम म्हणजे …
तू अणि मी, कायम जवळ असण
शोधत असतो मी तुला
तुझ्या नेहमीच्याच वळणांवर
आणि आजकाल असतं फक्त शोधणं
हरवलोय मी त्या वळणांवर...
त्रास तुलाही, त्रास मलाही
उगाच फुसकं गुरगुरणं
सवय तुझी जुनाट खोडी
मनात काळं भिरभिरणं...
खेळ सोडायचे अर्ध्यावर
तरी उगाच फेकले फासे
आणि आलो तरी मी मागावर
हे तुला न समजत कसे...
तडफड तडफड
नुसतीच चरफड
वैताग आलाय नुसता
आणि मी न येणार मागे आता...
अश्या मी खाल्ल्या खस्ता
चालू देत खेळ तुझे
चालु दे जीवांचे घोर
मी बाहेर पडणार आता
मी यातून बाहेर पडणार आता...
तुझ्या प्रेमाच्या झळा
मला न सोसणे आता...
तुझी खुप आठवण येतेय गं शोना...
कसे समजावु रे आता मी तुला,
तु खूप खूप आवडतोस रे मला...
जेव्हापासून पाहिले मी तुला,
चैन नाही एक पल मला.....
मनी स्वप्नी तुच आणि
फक्त तुच दिसतोस रे मला...
पैका अडका काहीच नको रे मला,
तुझ्या प्रमाची सावलीच पुरे रे मला..
तुच हवा आहेस रे
आयुष्याच्या जोडीला,
म्हणून रोज रोज
मागणं मागते रे देवाला
खरचं खूप आवडतोस रे मला
पण भिती वाटते तुझे नाव घ्यायला...
कारण सोडून जाशील वाटतं एकटीला,
तोडून आपल्या मैत्रीच्या नात्याला...
कधी समजून घेशील रे
माझ्या प्रेमळ मनाला..????
अजून किती वेळ लागेल रे
माझ्या प्रेमाची जाणिव व्हायला..???
कसे समजावु रे आता मी तुला,
तु खूप खूप आवडतोस रे मला...
पूर्वी तू माझ्याशी,
खुप काही बोलायचास,
वेळ नसला तरी माझ्यासाठी
खुप वेळ काढायचास,
तासन तास माझ्याशी खुप
गप्पा मारायचास.
नसले विषय तरी,
नविन विषय काढायचास.
काही ही बोलूंन मला,
खुप खुप हसवायचास,
माझा फ़ोन एंगेज असला की,
खुप खुप रागवायचास,
आता कशाला आमची गरज पडेल,
असं म्हणून सारख चिडवायचास,
माझा चेहरा पडला तर,
खुप नाराज व्हायचास,
मग sorry ही म्हणायचास.
आज ही मला तुझा,
प्रत्येक क्षणी भास होतो,
का रे असा वागतोस ?
का देतोस त्रास..?
मी प्रेम केलं........... ....
तू घेतलेल्या प्रत्येक श्वासावर,
हृदयातील स्पन्दनावर,
माझ्याशी बोलत तू जागून
काढलेल्या रात्रीवर,
मी फक्त प्रेम केलं ...............
प्रेम फक्त करायचं असत निस्वार्थ
मानाने......... .
प्रेम फक्त द्यायचं असत निरपेक्ष
अंतकरणाने...... ...
मी फक्त प्रेम केलं
मनापासून....... मनावर..
आणलाय गं वसंत
ओंजळीत मी भरून
प्रीतीच्या या कळ्या
आल्यात गं उमलून
हे प्रीत चांदणं
वेचून घे जरा...
बघ तुला जमलं तर
जगून घे जरा...
नको दवडू हे क्षण
येणार न पुन्हा
हातनं निसटले तर
वाटेल तुला गुन्हा
अमृत हे प्रेमाचे
पि ना जरा...
बघ तुला जमलं तर
जगून घे जरा...
प्रिये
बघ तुला जमलं तर
जगून घे जरा...
वेडं मन हरवलं माझे तुझ्या प्रेमात
या वर्षी तरी देवा मला एक
gf दे ..
गोरी गोरी नसली तरी चालेल
सावली दे..
श्रीमंत नसली तरी चालेल...
गरीब दे..
जी माझ्या manala
samjel....
जी माझ्या हृदयाला जपेल ...
...
या वर्षी तरी देवा मला एक
gf दे..
गेले कित्येक वर्षे
मी मित्रांच्या गफला बघत आलो..
गले कित्येक दिवस नुसते
स्वप्नेच बघत बसलो..
पण देवा आता तरी ऐक न
माझे..
कुठ ेतरी सेटिंग लाऊन दे..
पण देवा आता तरी ऐक न
माझे..
माझ्या हातात
तिचा हात येऊ दे...
या वर्षी तरी देवा मला एक
gf दे..
जी जीवनात माझ्या सुख
आणेल..
माझी स्वप्ने पूर्ण
करायला मदत करेल..
जी दुखत
माझ्या सहभागी असेल..
अश्रू पुसायला प्रथम
तिचा हात असेल..
या वर्षी तरी देवा मला एक
gf दे..
जी मी कला का गोरा बघणार
नाही..
नको त्या अपेक्षा करणार
नाही..
जी मी श्रीमंत का गरीब
पाहणार नाही..
नको त्या कारणावरून
भांडणार नाही...
या वर्षी तरी देवा मला एक
gf दे..
जी माझ्यावर संपूर्ण
विश्वास ठेवेल..
काटेरी रस्त्यावर
चालताना हात सोडणार
नाही..
जी विश्वासघात करणार
नाही..
प्रेमामध्य ेकधी स्वार्थ
बघणार नाही..
या वर्षी तरी देवा मला एक
gf दे..
आता तरी माझी हवा होऊ
दे..
आपल्याकडे पण आहे
चिकणी पोरगी
आता तरी शायनिंग मारू
दे...
आपल्याकडे पण आहे
पार्टी..
एक एक बेअर होऊन जाऊ
दे...
या वर्षी तरी देवा मला एक
gf दे..
वाट बघून बघून
म्हातारा होईल रे मी
काही तरी जुळवून दे..
स्वप्ने बघून बघून वेद
होईल रे मी..
काही तरी मिळवून दे...
या वर्षी तरी देवा मला एक
gf दे..
ह्या वर्षाकडून खूप
केल्या आहेत अपेक्षा ........
करू नको उपेक्षा..
ह्या देवाकडून खूप आहेत
आशा ...
करू नको निराशा..
या वर्षी तरी देवा मला एक gf दे..
Sudarshan
मुलींना ओळखणं कठीण असतं…………
मुलींना ओळखणं खरंच कठीण असतं का हो?
त्यांच्या मनात काय चालू असतं हे एक देवच काय
ते जाणे अन् ती मुलगी.
तुम्ही तिची तारीफ केली, तर तिला वाटतं
तुम्ही खोटं बोलता आहात,
तारीफ केली नाही, तर तुम्हाला मुलींशी कसं
वागायचं तेच कळत नाही.
तिच्या सगळ्या म्हणण्याला होकार दिला, तर
तुम्हाला स्वत:चे विचारच नाहीत.
होकार नाही दिला, तर तुम्ही तिला समजूनच
घेत
नाही.
तुम्ही तिला वारंवार भेटलात, तर ते
किती बोअर
असतं.
तिला वारंवार भेटला नाहीत, तर
तुम्ही तिला डबलक्रॉस करताय?
तुम्ही वेलड्रेस आहात, तर तुम्ही नक्कीच प्लेबॉय
आहात
तुम्ही नीट कपडे केले नाहीत, तर
तुम्ही किती गबाळे आहात हो?
तुम्ही जेलस होता, किती वाईट आहे हे!
तुम्ही तिच्यासाठी जेलस होत नाही? तुमचं
तिच्यावर प्रेमच नाही
तुम्हाला यायला एक मिनिट उशीर झाला, तर
वाट
पाहणं किती कठीण असतं?
तिला यायला उशीर झाला, तर
मुलींना होतो असा उशीर!!!
तुम्ही कोणाला भेटायला गेलात, तर तुम्ही वेळ
फुकट घालवता
ती कोणाला भेटली, तर ते कामासाठी असतं…
रस्ता ओलांडताना तिचा हात धरला नाही, तर
तुमच्याकडे एथिक्सच नाहीत
तुम्ही हात धरला, तर तिला स्पर्श
करण्याची संधीच शोधत असता.
तुम्ही दुसऱ्या स्त्रीकडे पाहिलं, तर तुम्ही फ्लर्ट
करता
दुसऱ्या पुरुषाने तिच्याकडे पाहिलं, तर
तो तिच्या सौंदर्याचं कौतुक करत असतो.
तुम्ही बोलत असाल, तर तुम्ही ऐकावं असं
तिला वाटतं
तुम्ही ऐकत असाल, तर तुम्ही बोलावं असं
तिला वाटतं.
अशा या साध्या, तरीही समजून
घ्यायला कठीण
अशा मुली.
यांना समजून घेणं कठीण असलं, तरी.........
प्रेमात पडलं की असच होणार..!
दिवस रात्र डोळ्यासमोर तोच
चेहरा दिसणार,
स्वप्नात सुध्धा आपल्या
तिच व्यापुनउरणार
...
येता जाता उठता बसता,
फक्त तिचीच आठवण होणार
तुमच काय, माझं काय,
प्रेमात पडलं की असच होणार..!
कधीतरी कुणाच्या तोंडून नाव
ऐकायला मिळालं,
काय
करते आता ती?
कुठे आहे सध्या?
मग लक्षात आलं, अरे!
आपण तर पुरतेच विसरलो तिला...
खिशातून मोबाईल काढला, तिचा नंबर
शोधायला,
पण
तिचा नंबरच लागला नाही... कदाचित
बदललेला नंबर
माझ्याकडे नव्हता.
मग आणखी कुणाकडे तिचा नंबर
भेटतोय का?
कारण तिची मनापासूनच आठवण येत
होती,
न सांगता एकमेकांच्या मनातलं
ओळखणारे,
असं नातं होतं आमचं,
कुणाचीही नझर लागण्यासारखं...
पण असं काहीतरी घडलं, आणि.....
आता कशी असेल ती?
कुठे असेल ती?
असे अनेकानेक प्रश्न डोक्यात येत
राहीले...
आपणच सांगितलेलं तिला कि,
नेहमी तुझ्या सोबत
असेन,
पण ती गोष्ट आपणच विसरलो...
मग तिच्या घरी सहजच फोन केला,
कसे आहेत सगळे,
अशी विचारपूस करायला?
खरं तर फक्त
तिच्यविषयी विचारायचं होतं,
विचारलं
मग, कसे आहेत सगळे?
थोडं थांबून मग उत्तर आलं,
कि सगळे ठीक आहेत...,
माझी मैत्रीण काय म्हणते?
ती आता काय बोलणार?
आणि ती काही बोलू शकते का आता?
थोड्या शांततेनं मग मी विचारलं...
असं का म्हणताय?
अरे,
तीकाही बोलायला,
ती या जगात असायला तरी पाहिजे
ना?
तुझी खूप रे वाट पाहिली तिनं,
अगदी शेवटच्या क्षणापर्यंत,
पण तू मात्र आला नाहीस....
तिला काहीतरी झालं होतं...
मी फक्त ऐकतच राहिलो,
शब्द तर बाहेर पडायलाच तयार
नव्हते,
अश्रू मात्र भळाभळा वाहत होते...
मग आवाज आला, ऐकतोयस ना !!
तू अजिबात वाईट वाटून घेऊ नकोस,
आणि दु:खीही होऊ नकोस, असं
तिनंच
मला सांगितलंय
तुला सांगायला...
आणि हो तुझ्यासाठी काहीतरी लिहून
तिनं ठेवलंय,
ती म्हणालेली, माझी आठवण
त्याला नक्की येईल,
आणि तो इथे फोन करेल,
तेव्हा त्याला दे...
तुला जमेल तसं ये आणि घेऊन जा,
आणि मी फोन ठेवला....
तिनं घरीही सांगून ठेवलेलं,
मी गेल्यावर कुणीही रडायचं नाही,
नाहीतर
तिही रडत
राहणार,
दु:खी राहणार,
म्हणून तिच्या घरातले रडत नव्हते,
फक्त तिच्यासाठीच.... .!!!
मग मी तिच्या घरी जाऊन
ती चिट्टी घेऊन
आलो...
असं वाटतंय कि तू मला विसरलास
मला...
अशीच सुरुवात होती...
कसा आहेस...?
मला माहित होतं...
तुला माझी आठवण
कधी ना कधी नक्की येईल, पण
तू
दु:खी होऊ नकोस,
स्व:ताची काळजी घे, खूप
मोठा हो, स्व:ताची स्वप्नं पूर्ण कर,
तशी केली असशीलही...
खरं सांगू जाता जाता तुझी खूप
आठवण येत होती,
कदाचित तू येशील म्हणून जीव
तुझ्यात अडकून
राहिला होता, पण तू नाही आलास, मग
विचार
केला,
तुझ्यासाठी जाता जाता काहीतरी बोलून
जावं,
मला खात्री होती,
तू हे नक्की वाचशील !!!
या जन्मात मी तुझी होऊ
शकली नाही....
पण पुढच्या जन्मी माझा होशील
ना रे?? फ़क्त तुज़ा
तुझ्या येण्याची वाट बघतं,
शीतल चंद्राला पाहत बसत...
अन् चंद्राला पाहताना मला,
पून्हा तुझा हसरा चेहरा दिसतं...
आकाशातील हळवे धुदं वारे,
स्पर्शुनी पुन्हा मला जात रे...
जणु पहिल्या भेटीत तूझ्या,
माझं हरवलेले वेडं भान रे...
सागरी समुद्राच्य निळसर लाटा,
बोलत होते माझ्याशी एकटेपणात...
अन् सागंत मला प्रत्येक क्षणी,
तु येशील पुन्हा माझ्या जीवनात....
नसतं का भान माझ्या मला,
भिजवत स्वःताला पावसात...
अन् ओल्या तुझ्या आठवणी,
साठलं माझ्या वेड्या मनात...
तुझ्या येण्याची वाट बघत..!!
तुझ्यासाठी सगळ काही सहन करेन,
तुला सुखी ठेवण्यासाठी कष्ट करेन,
तु फ़क्त हो म्हण...
जीवनाच सोन करेन,
सगळ सुख मी तुला देइन,
तुझीच पुजा आयुष्यभर करेन,
तु फ़क्त हो म्हण...
या जगाला सुद्धा जिंकून दाखवेन,
प्रेम काय असत हे दाखवुन देइन,
तु फ़क्त हो म्हण...
माझ्याबरोबर सदा रहा,
अशीच साथ आयुष्यभर देत रहा,
मला तुझ्या प्रेमात पडु दे जरा,
तु फ़क्त हो म्हण.
खुप ऊदास वाटतं विचार केला की..
का आणि कशासाठी या जाती पातीचा रगडा लावलाय
या समाजानं ..
पहिल्या धक्यातच जिवनच संपल्यासारखं वाटतं
होत
कारन त्यावेळी हारलो होतो ईश्वरापुढे
पण
सावरनारे होते काही जिवाभावाचे.
कसाबसा त्यातुन
सावरलो माञ परत मी या वाटेवर येईल असं कधीच
वाटलं नव्हंत पण आज परत या जातीच्या राड्यात
पुन्हा एकदा जिवनात दुसरंदा हार झाली...
बरच काही ऐकलं होतं जात नाही धर्म नाही तर
का आजही खेड्यात
लग्णासाठी का पाहावी लागतात
नातीगोती...
माज्यासारखे कित्येक जन याच प्रश्नाचे....
जेव्हा कुणी खूप हसतो,
काही फालतू गोष्टीवर पण हसत
असतो..
असा व्यक्ती आतून खूप दुखी असतो...
जेव्हा एखादा व्यक्ती खूप वेळ झोप काढतो..
म्हणजे तो व्यक्ती खूपच एकटा असतो..
काही व्यक्ती सहसा जास्त बोलत नाही...
आणि बोलायला सुरुवात केलीकि खूप पटापट
बोलतात
म्हणजे अशा व्यक्ती खूप काही सिक्रेटस लपवून
ठेवू
पाहतात
जेव्हा एखादा व्यक्ती अजिबात रडत नाही...
म्हणजे तो खूपच अशक्त ( Weak) असतो
जेव्हा एखादा व्यक्ती खूप
अधाशा सारखा कसाही
खात सुटतो ,
म्हणजे त्या व्यक्तीला खूप टेन्शन असते
आणि शेवटच महत्वाच
आपल्या कामातून वेळ काढून
जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल खूप
चौकशी करते ,
म्हणजे ती व्यक्ती तुमच्यावर खुप प्रेम करते !!
Sudarshan
हो आजपासून नाही देणार त्रास तुला....
नाही प्रयत्न करणार तुला आठवण्याचा..
तडफडत असाच एकटी जगणार....
उचकी आली तुझ्या आठवणीची तर...
तुझच नाव ओठांवर येणार....
पण तरीही स्वतःला सावरणार....
तुझ्यावर केलेल्या प्रेमाखातर...
तू म्हणशील तेच करणार..
सगळं काही बदलणार....
पण बरोबर तू नसणार...
सगळं शांत होऊन जाणार...
बघायला तू नसणार....
एकटीच होते अन आता एकटीच राहणार...
सोबत फक्त तुझी नसणार
सोबत फक्त तुझी नसणार.... ![]()
असं फक्त प्रेम असंत
त्याला हृदयातचं जपायचं असतं
सुखाचा महासागर, दुःखाचा डोंगर
हास्याचा फुलोरा,
कोसळणारा अश्रुंचा मनोरा
फुलपाखरासारखं चंचल, दगडासारखं अचल
असं फक्त प्रेम असंत
प्रेमात अधिकार असतो
पण गाजवायचा नसतो
प्रेमात गुलाम असतो
पण राबवायचा नसतो
असं फक्त प्रेम असंत
नेहमीच एकट्याचं असतं
पण दुसऱ्याशिवाय शक्य नसतं
कळत नकळत कसं होतं
ते मात्र कधीच कळत नसतं
..असं. असं फक्त प्रेमच प्रेमचअसतं.....
का? तुला पाहिल्यावर मन माझं भरुन येत.
अस का होत?
सकाळी डोळे उघडताच तुझाच विचार येतो
नजरे समोर फक्त तुझाच चेहरा दिसतो
मग हात वळतात mobile कडे
तुलाच msg करायला,
नंतर डोळे लागतात ते तुझ्या Reply ची वाट
बघतात
अस का होत?
बघता बघता सकाळ सरून जाते
तेव्हाही तुझाच विचार
लक्ष फक्त mobile कडेच
तु जेवला असशील कि नाही
कि कामामध्ये Busy असशील
काळजी ही सारखी लागूनच राहते
ती पण फक्त तुझीच
का अस होत?
घरात असतानाही तू बरोबर असतोस
बाहेर पडल्यावरही तूच बरोबर चालतोस
एक क्षण ही दूर जात नाही तू
खर तर मीच जाऊ देत नाही तुला
एक क्षणाचाही दुरावा सहन होत नाही रे मला
खरचं असं का होत?
रात्रीही तुलाच आठवून
निजावस वाटत
तुझ्याच स्वप्नात रमावस वाटत
तुला msg केल्याशिवाय दिवस पूर्ण होत
नाही रे
माझा
सख्या सांग ना रे कोण आहेस तू माझा?
पण एक खरं सांगू का रे तुला.....
हे अस का होतय
माहित आहे रे मला
यालाच तर प्रेम म्हणतात जे
झाल आहे रे मला
जे कधीही कमी नाही होणार
दूर कितीही गेले तरीही
आस तुझीच कायम असणार
पण कम नशिबी मीच रे जिला
साथ तुझी नाही लाभणार
अखेर
ईश्वराकडे एकच प्रार्थना रे....
कुठेही रहा
कसाही रहा
कोणाबरोबरही रहा
सदैव खूश रहा
कारण
तूझ्या सुखातचं माझ सौख्य
सामावलय रे राजा.
तुझ्या आठवणी म्हणजे...
मोरपिसाचा हळूवार स्पर्श
तुझ्या आठवणी म्हणजे...
नकळत निर्माण होणारा हर्ष
तुझ्या आठवणी म्हणजे...
स्वप्नांनी सजवलेलं एक गाव
तुझ्या आठवणी म्हणजे...
विरह सागरात हरवलेली नाव
तुझ्या आठवणी म्हणजे...
आयुष्य जगण्याची आशा आणि
तुझ्या आठवणी म्हणजे...
गमवलेल्या गोष्टींची निराशा
तुझ्या आठवणी म्हणजे...
पावसात चिंब भिजणं
तुझ्या आठवणी म्हणजे...
ओसाड वाळवंटात एकटच भटकणं
तुझ्या आठवणींशिवाय
आयुष्यच अर्थहीन आहे
तुझ्या आठवणींचा सहवास
हाच माझ्या आयुष्याच रंग आहे.....!!!
कितीही सुंदर
चेहरा असला तरी त्या चेहऱ्यान
वेड लावलं असलं तरी, फक्त आकर्षून
घेण्यासाठी त्या चेहऱ्याचा उपयोग
होतो पण,
खंर प्रेम मिळवायचं असेल
न कायमच कुणाला वेड लावायचं असेल तर, .
.
.
.
.
.
फक्त सुंदर मनाचाच
उपयोग होऊ शकतो.
.
सुंदर मनावर झालेलं प्रेम दूर जाऊनही मन विसरू
शकत नाही, कारण दुसरा सुंदर चेहरा भेटू
शकतो,
पण सुंदर मन सहज भेटू शकत नाही..
लाजून तू हसतेस
हसून तू लाजतेस
नजरेच्या कटाक्षाने
घायाळही करतेस .......
समोर आल्यावर
गप्प तू बसतेस
काही न बोलताच
सगळे सांगून जातेस ....
थोडीशी रुसतेस
जराशी भांडतेस
हसून गाली जरा
मलाच तू सांगतेस .....
मनीच्या स्पर्शाने
मला तू खुलावतेस
अलगद त्या मिठीने
सर्वांग माझे फुलवतेस ......
भेटीच्या विरहाने
अश्रू नयनी आणतेस
दूर दूर जाताना
वळून वळून पाहतेस .......
तुझ्या ह्या स्वभावाने
मला तू आवडतेस
पुन्हा भेटीच्या निमित्ताने
मन माझे सुखावतेस.....
आठवण माझी कधीतरी येईलच तुला
- आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेन ..!
माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेन ..!
कधी जर पाहशील पौर्णिमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच
असेन ..!
कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुक मीच असेन . तुझा
एक अश्रू..
तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
जेव्हा ..गर्दीतही खूप एकटंवाटतं..
तेव्हा..
तो अश्रू..
... हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो..
पण वाहत मात्र नाही,
एक पाऊल..
तुझ्यासाठीच अडखळणारं,
तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं..
वाटेवरल्या एकटेपणात..
तुझी पाऊलखूण शोधणारं..
एक नजर..
जी सारखी तुलाच शोधते...
प्रत्येकाच्या डोळ्यात..
तुझीच छबी शोधते..
मागे वळून ..
पुन्हा पुन्हा..
तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..
एक मिठी..
तुझ्याचसाठी रिकामी..
तुझ्याशिवाय मोकळी..
एक कुंचला..
तुझ्या येण्याकडे लक्ष असलेला..
तू येऊन पुन्हा..
रंग भरशील माझ्या आयुष्यात..
अशी आस लावणारा..
एक जीव..
तडफडणारा..
असहाय्य..
तुझ्याविना..
तुझ्याचसाठी....
Sudarshan
wrote:
ती समोरून आली तरीही शब्दान्ना बांध फुटत
नाहि,
विचारीन विचारीन म्हणतोय,
पण धाडस होत नाहि...
वर्षे लोटली तरी फ़क्त तिच्यावरच मरतोय,
शप्पथ सांगतो फ़क्त तिचाच विचार करतोय...
...वही मागण्याशिवाय कधी बोललो नाहि,
विचारीन विचारीन म्हणतोय,
पण धाडस होत नाहि..
माहित नाहि ,
ती मरते का नाहि मज्ह्यावर..??
का तीच ह्रदय आहे,
फ़क्त एक "सजीव कलेवर"..?
चांदण्यात फिरण्याचा आनंद
आम्हालाही मिळणार
की नाहि..??
विचारीन विचारीन म्हणतोय,
पण धाडस होत नाहि..
Valentine Day ला बूके घ्यायला जातोय,
खिशाचा विचार करून फुलावरच भगवतोय,
या "गरिबाच प्रेम" ती स्वीकारणार
की नाहि..??
विचारीन विचारीन म्हणतोय,
पण धाडस होत नाहि...
तिच्यासाठी घेतलेल फुल वहितच कोमेजतय,
माझ काळीज मात्र तिचीच आस धरतय...
कितीही ठरवून गेलो तरी,
ह्रदय मात्र बोलत नाहि..
विचारीन विचारीन म्हणतोय,
पण धाडस होत नाहि...
वाटतय,
तिच्याही वहित असेल एखाद फुल मज्ह्यासाठी,
का आहे ही भोली समज
या वेड्या मनासाठी..??
आयुष्यातल पहिल - वहिल प्रेम मिळणार
की नाहि...??
विचारीन विचारीन म्हणतोय,
पण धाडस होत नाहि...
Sudarshan
wrote:
जपून टाक पाउल...... इथे प्रत्येक वाट
आपली नसते ........
जपून ठेव विश्वास ........ इथे प्रत्येक
मानुस आपला नसतो ......
जपून घे निर्णय ....... इथे प्रत्येक पर्याय
आपला नसतो .......
जपून ठेव आठवन ....... इथे प्रत्येक क्षण
सारखा नसतो .......
जपता जपता एक कर ........ जपून ठेव मनं
कारण ..........
ते फक्त आपल असत......... ते फक्त आपल
असत........
Sudarshan
माझ्या जिवनातिल खरी एक
छोटीशी प्रेमकथा.....
नकी वाचा
मी सातवीत होतो त्यावेळी तुझं नवीन
अॅडमिशन
आमच्या वर्गात झालं.तु पुढच्या बँचवर
बसायचीस.बघताक्षणीच मला तु
आवडली होतीस.कितीतरी वेळा मी तुझ्याकडे
चोरुन
बघायचो.मी एकटाच नाही वर्गातली सर्वच मुले
तुझ्याकडे बघायचे.आपलं नेहमी बोलणं
व्हायचं.तुझ्या त्या सुंदर ओठांमधुन बाहेर पडणारे
शब्द मला खुपच आवडायचे.एक दिवस तुला प्रपोज
करायचं ठरवुन आलो पण वर्गाँसमोर एकट्याला तु
कानाखाली लावलीस.नंतर कळ
लं की त्याने तुला i love u म्हटलं होतं.मग भीतीने
तुला प्रपोजच केलं नाही.आपण आठवीमध्ये
गेलो.एक दिवस तु घरी नोट्स
मागायला आलीस.घरी कोणी नव्हतं
तेव्हा मला वाटलं मी तुला सांगुन
टाकावंसगळं.पण
नोट्स देताना तुझ्या हाताचा स्पर्श
झाला आणि सगळंच विसरुन गेलो.तु ही मागे वळुन
माझ्याकडे पाहात निघुन गेलीस.तुझा स्पर्श
झालेल्या हाताला मी आठ दिवस रुमाल
बांधला होता कारण तो स्पर्श तसाच
राहावा बाबा तर काहिच म्हनत नवते
म्हणुन...आईच्याविचारण्याने आईला सांगितलं
की शाळेमध्ये खेळताना पडलोय म्हणुन....
आपण नववीत गेलो.एक दिवस
तुझी ग्रहपाठाचीवही पुर्ण नव्हती,आणि सर
तुला छडी मारतील म्हणुन
मी ती वही तुला दिली.ती तुझी म्हणुन
सरांसमोर
सादर केलीस.तुझ्यासाठी मी मार
खाल्ला होता कारण माझ्याकडे
वही नव्हती..मार
खाल्ला त्याबद्दल काही नाही गं,पण
वही जरा व्यवस्थित उघडुन तरी बघायचीस
त्याच्या शेवटच्या पानावर तुला लिहिलेलं
प्रेमपत्र
होतं.ही वेळही निघुन गेली.
आपण दहावीत गेलो.वर्षभराच्या मस्तीनंतरजेव्हा
सेँडपचा दिवस आला.त्यावेळी तु माझ्यापासुन
खुप
दुर होणार म्हणुन आधीच मी मनापासुन
हेलावला गेलो होतो.तु समोर आलीस
डोळ्यातलं
पाणी लपवण्यासाठी मी मान
खाली घातली रडत
रडत माझ्या कानात म्हणालीस i love
u.मी एकदम दचकलोच.मला कळलंच नाही कि हे
कधी झालं.ती म्हणाली,मी सातवीपासुन
तुझ्यावर
प्रेम करते,पण ते तुला कधी कळलंच
नाही.सांगायचंहोतं तुला पण हिंमतच
झाली नाही.असं म्हणुन ती रडत रडत निघुन गेली।
माझे डोळे पाण्याने डबडबले होते.तिच्या मागे
धावणार्या माझ्या नजरेतुन पाण्याची एक धार
लागली होती.मी फक्त
तिच्या त्या धावणार्या सावलीला बघतच
राहीलो.सांगितलंस तर कधी जेव्हा आपण दुरजात
होतो.आपले मार्ग वेगळे होत होते तेव्हा....
का जाता जात वेड लावुन गेलीस,
जायचंच होतं दुर तर आयुष्यातच
का होती आलीस।।
प्रेम होतं तुझं तर सांगायचं तरी होतंस,
मी नाही बोलु शकलो तर झालं काय?तु
बोलायचं
तरी होतंस.
दुर गेलो असतो घेऊन तुझ्या आठवणींचा पसारा,
पण शेवटच्या क्षणी हात देऊन दुर केलास सहारा,
असं वाटलं जीव जाऊन मग मिळाला किनारा।
कसली ही आपली अजब प्रेमकहाणी आहे,
ज्यात प्रेम कमी,विरह जास्त आणि डोळ्यांत
पाणी आहे।। Sudarshan
सुखाला सामोरे जाण्यातच खरं कौशल्य असतं..
त्यात जमिनीवर राहूनही आकाशात उडायच
असतं..
आपल्या मनासारखं कधीचघडत नसतं..
हीच माझी ओळख असं नशीब म्हणत असतं..
ऊन एकटं कधीच येत नाही ते सावलीला घेऊनच
येतं..
दु:खाचं अन सुखाचं हेच नातं असतं,
दु:खच नसेल आयुष्यात तर मजा घेता येईल का..??
ओलं न होता कधीतरी पावसात भिजता येईल
का.....??
Sudarshan
बायको : "अहो एक सांगू का? पण मारणार तर
नाही ना?"
नवरा : "हो सांग ना".
बायको : मी गरोदर आहे."
नवरा : "अग हि तर
आनंदाची बातमी आहे
मग तू एवढी घाबरतेस का?"
बायको :
.
.
.
.
.
.
.
"कॉलेजला असताना हि बातमी बाबांना सांगितली तेव्हा
त्यानी
खुप
मारलं होत".
wrote:
जरा बुद्धीला चालना द्या बरं.....!
एका माणसाचा खूण
झाला ..Sunday7 jan, 2007 वेळ दुपारची...
त्याच्या बायकोने पोलिसांना बोलावले
पोलीस चौकशी चालू झाली .
बायको : सर,मी झोपलेली होते खुण
झाला तेव्हा .
.
स्वयंपाकी : मी जेवण तयार करत होतो.
.
माळी : मी फुलांना पाणी देत होतो. .
नौकर : मी पोस्ट ऑफिस ला गेलो होतो .
.
मुल : आम्ही खेळत होतो.
शेजारी :आम्ही लग्नाला गेलो होतो
. पोलीस नी लगेच आरोपीला अटक केली..
.
.
.
...Reply कोण असेल खूणी ...??
जो बरोबर उत्तर देईल,त्याचे नाव पेजवर
टाकन्यात येईल…"
जो कोणी सर्वात अगोदर जिंकेल त्याचे नाव
पेजवर टाकुन 100 रूपयाचे रिचार्ज नक्की केले
जाईल
काल 140 मुले आणि 130 मुली खेळल्या आज
कोण-कोण खेळणार??
गेम टाईम....
सर्वांना माझे ओपन चॅलेंज!!!
तुम्ही स्वत:च नाव
अशा प्रकारे लिहून दाखवा....
P
r
a
j
k
a
t
a
नियम :-
1) एका कमेंट मध्ये एकच अक्षर हवे !!.
2) जर तुमच्या नंतर लगेच कोणी कमेंट
टाकली तर परत पहिल्यापासून लिहावे लागेल.
ओल्या सांजवेळी, उन्हे सावलीस बिलगावी
तशी तू जवळी ये जरा
कोऱ्या कागदाची, कविता अन जशी व्हावी
तशी तू हलके बोल ना
आभाळ खाली झुके, पावलांखाली धुके
सुख हे नवे सलगी करे, का सांग ना
सारे जुने दुवे, जळती जसे दिवे
पाण्यावरी जरा सोडून देऊया
माझी ही आर्जवे, पसरून काजवे
जातील या नव्या वाटेवरी तुझ्या
रस्ता नवा शोधू जरा, हातात हात दे
पुसुया जुन्या पाउल खुणा
सोबत तुझी साथ दे
वळणावरी तुझ्या पाऊस मी उभा
ओंजळ तुझी पुन्हा वाहून जाऊ दे
डोळ्यातल्या सरी विसरून ये घरी
ओळख आता खरी होऊन जाऊ दे
सांभाळ तू माझे मला माझ्या नव्या फुला
मी सावली होऊन तुझी देईन साथ ही तुला
Sudarshan
प्रेमाचा अर्थ ...............सकाळी डोळे
उघडण्यापूर्वी ज्याचा चेहरा पाहण्याची इच्छा
होतेते
प्रेम आहे..मंदिरा मध्ये दर्शन
करताना जो जवळअसल्याचा भास होतोते प्रेम
आहे..भांडून सुधा ज्याचा राग येत नाहीते प्रेम
आहे..ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर पूर्ण
दिवसाचा थकवा दूर झाल्यासारखे वाटतेते प्रेम
आहे..ज्याच्या कुशीत डोके ठेवल्यावर मन मोकळे
झाल्यासारखे वाटतेते प्रेम
आहे..स्वताला कितीही त्रास
झाला तरीही ज्याच्यासाठी ख़ुशी मागतोते
प्रेम
आहे..ज्याला लाख
विसरण्याचा प्रयत्करा विसरता येत नाहीते प्रेम
आहे..कुटुंबाच्या फोटो मध्येआई बाबाच्या सोबत
ज्याचा फोटो असावा असेआपल्याला वाटतेते
प्रेम
आहे..ज्याच्या चुकीना रागावतो आणि नंतरएकांतात
हसू येतेते प्रेम आहे..हि पोस्त
वाचताना प्रत्येकओळीला ज्याची आठवण
आलीते
प्रेम आहे...
Sudarshan
ती :"मस्त ना?
पाउस म्हणजे थंड वारा..."
तो :"नाही गं
पाउस म्हणजे चिखल सारा..."
ती :"गप रे....
... पाउस म्हणजे हिरवीगार झाडं..."
तो :"अगं पाउस म्हणजे..
ट्रेनचे वांदे आणि ऑटोरिक्षाचं भाडं...."
ती :"सुधारणार नाहीस तू
पाउस म्हणजे वेडी सर....."
तो :"हा हा...
पाउस म्हणजे कपड्यांवर चिखलाची भर...."
ती :"पाउस म्हणजे
भिजलेल्या मातीचा गंध..."
तो :"हा हा मातीचा गंध,
पाउस म्हणजे जायचे यायचे वांदे,पण office
नाही बंद.."
शेवटी ती:-"किती bore आहेस रे तू?
जा मला नाही बोलायचं तुझ्याशी."
हे ऐकून त्याने तिच्या कानात
काहीतरी सांगितले,
ती गालातल्या गालात सुंदर लाजली अन
त्याला बिलगली.
तो म्हणालेला:-"हे बघ,तुझ्यासाठी पाउस म्हणजे
जे असेल ते असेल,
पण माझ्यासाठी
"तुच माझी सर,अन् तूच माझा पाउस,
फक्त मला कधीहि सोडून नको जाउस."
Sudarshan
गंध आवडला फुलाचा म्हणुन फुल मागायचं नसतं
गंध आवडला फुलाचा म्हणुन फुल मागायचं नसतं
अशावेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं
असतं
परक्यापेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग् नजरेआडुन होतात वार
भळभळणार्या जखमेतुन विश्वास घाताच रक्त
वाहतं छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणचं
पुसायचं असतं
अशावेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं
असतं
आपलं सुख
पाहण्याचा तसा प्रत्येकाला अधिकार
आहे .
पण;दुसर्याला मारुन जगण
हा कुठला न्याय आहे माणुस म्हणुन माणसावर
खरं
प्रेम करायचं आपल्यासाठी थोडं
दुसर्यासाठी जगायचं
जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बनवायचं असतं
अशावेळी आपणच आपल्या मनाला आवरायचं
असतं
Sudarshan
खूप रडली रे मी तुझ्यासाठी,
इतकी की अश्रूही आटून गेले,
खूप प्रयत्न केले, तुला मिळविण्यासाठी,
पण सारेच व्यर्थ ठरले...
कधी कधी असं वाटतं,
आपल्याच आयुष्यावर आपलाच हक़्क़ नसतो.....
Comments
Post a Comment